Skip to Content

Languages

विवेकानंद शीला स्मारक

VRM
माझ्या मृत्युनंतरही मी माझे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुढील पिढीला प्रेरणा देत राहीन -- स्वामी विवेकानंद

आपण पाहत आहोत कि हे घडत आहे. स्वामीजी ते काम अनेक स्त्रोतातून करत आहेत.कन्याकुमारीचे भव्य शीला स्मारक असाच  अमर प्रेरणा स्त्रोत आहे.

विवेकानंद शीला स्मारक जसे स्वामीजींचे स्मारक आहे तसेच ते मा. एकानाथजीं रानडेंचे  स्मारक  सुद्धा आहे .मा एकानाथाजीनी  शीला स्मारकाच्या  कामासाठी वाहून घेतले होते त्यामागची प्रेरणा  ही ,  श्रद्धा आणि  वैचारिक दृढता  यातून निर्माण झाली होती. एकात्मता आणि पावित्र्य यांचे अनुपम प्रतिक , कन्याकुमारीचे  शीला स्मारक आहे. तसेच ते भारताच्या एकात्मतेचे आणि आकांक्षेचे   दर्शन आहे.  भारताच्या प्राचीन स्थापत्य कलेचा मनोहर संगम आहे. भारत वासियांनी केलेल्या कामाचे, आकांक्षांचे , योगदानाचे ते प्रतिक आहे. भारताच्या सर्व प्रांतातील लोकांनी उद्घाटन सोहोळ्यामध्ये   भाग घेतला होता.  शीला स्मारकाची निर्मिती,  राष्ट्रीय  स्वयंसेवक  संघाच्या विचारातून आणि  कष्टातून,  रामकृष्ण मिशनच्या आशीर्वादाने,  कांची कामकोटी मठाच्या  पर्माचार्यांच्या कल्पनेतून, मुक्तहस्ते प्रथम देणगी देणारे  चिन्मय मिशनचे स्वामीजी चिन्मयानंद यांची  आहे. भारतातील सर्व  अध्यात्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय संघटनानी आपला पाठींबा  दिला होता. भारताच्या सर्व राज्यांचे आणि केंद्रीय सरकारचे  सहाय आणि मदत  या कामासाठी झाली  आहे. कन्याकुमारीच्या महासागराच्या त्रिवेणी संगमाप्रमाणेच  हे केंद्र देशाचे आकर्षण झाले आहे.

 विवेकानंद शीला स्मारकाचे उद्घाटन समारोहाचे समयी  राष्ट्रपती श्री वी .वी गिरी यांनी  २ सेप्तेम्बेर १९७० रोजी  लोकांना राष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. मा. . एकनाथजीनी  कन्याकुमारीच्या विशेश्तेविषयी त्यांच्या १९६६ मधील भाषणात सुंदर विचार मांडले आहेत.त्यांनी अनेक   प्रेरणादायक भाषण   मालिका   कन्याकुमारी येथे केंद्राच्या पहिल्या  तुकडीसमोर मांडल्या. त्यामुळे विवेकानंद शीला स्मारक आणि विवेकानंद केंद्र  स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट झाली.
 
या भाषण मालिका अनेक भारतीय भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत. 

Courtesy : View360 Virtual Tour India Ltd

Affordable Accommodation Available At Vivekanandapuram, Kanyakumari, click here to know more.